पालिकेचा अस्वच्छ कारभारा विरुद्ध कामोठे शेकाप आक्रमक..







पालिकेचा अस्वच्छ कारभारा विरुद्ध कामोठे शेकाप आक्रमक.. 
अस्वच्छ शौचालयाचे फोटो पालिकेला पाठवले ! 

सिडकोने कामोठेत ७० लाख खर्च करून सेक्टर ११ व ३५ मध्ये सुलभ शौचालय बांधले. अनेक महिने शौचालय वापराविना धूळखात पडले होते. त्यावेळी एकता सामाजिक संस्थेने टमरेल घेऊन पालिका मुख्यालयात येऊ असा इशारा दिल्यावर तत्कालीन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी तातडीने नागरिकांना उपलब्ध करून दिले. 



स्वच्छते मध्ये पारितोषिक मिळवण्यासाठी पनवेल महानगर पालिका रस्ते, तुटलेल्या भिंती रंगवण्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. परंतु कामोठे मधील ई-टॉयलेट बंद आहेत. सेक्टर ११ मधील सुलभ शौचालय मधील भांडी तुटली आहेत, साफसफाई यौग्य होत नाही. नागरिकांना याचा वापर करणे म्हणजे नरकात जाणे असे आहे. यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींची कुचंबणा होत आहे. शौचालय भर मैदानात आहे परंतु सदर वासमुळे कामोठे मधील मुले येथे खेळण्याचे टाळतात. या मैदानात कार्यक्रम करायचा असेल तर पालिका मात्र भाडे घेण्यास विसरत नाही मग साफसफाई ठेवण्यास का कुचराई करतात? अशी भावना मा. नगरसेवक प्रमोद भगत यांनी व्यक्त केली. 



 शेतकरी कामगार पक्षाने शौचालयाचे फोटो पनवेल पालिकेला पाठवून आम्ही निषेध नोंदवला आहे, त्याउपर जर पालिकेने साफसफाई केली नाही तर शेतकरी कामगार पक्ष आणि एकता सामाजिक संस्था पुन्हा टमरेल घेऊन पालिका मुख्यालयात जाऊ असा इशारा अमोल शितोळे यांनी दिला आहे.


थोडे नवीन जरा जुने