कामोठे प्रदूषणाने हैराण







कामोठे विभागात रात्रीच्या वेळी उप्रवास येण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले असून कामोठे कॉलनी फोरमच्यावतीने थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे या तक्रारीची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळालाही घ्यावी लागली असून नुकतीच कामोठ्यातील प्रदूषणाच्या विविध कारणांची चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे...




कामोठे विभागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून उग्र वासाने हैराण केले आहे. याबाबत 'एकता सामाजिक संस्थेने थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच ई-मेलद्वारे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कामोठे शहराची पाहणी केली आहे. त्यामुळे काही दिवस वास येण्याचा बंद झाला होता; परंतु मागील काही दिवसांपासून पुन्हा वास येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले, गरोदर मातांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. यात सेक्टर ३६ मध्ये खाडी किनारी असलेल्या इमारतीमधील नागरिकांना उग्र वासाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.




 कामोठे कॉलनी फोरमच्या समन्वयकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून तत्काळ पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, उमेश जाधव यांनी सेक्टर ३६ येथील खाडी किनाऱ्याची पाहणी केली आहे. यावेळी कामाठे कॉलोनी फोरमचे सदस्यही उपस्थित होते.



अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने

काही दिवसांपूर्वी कळंबोली येथे टँकरद्वारे केमिकल खाडीमध्ये सोडले जात असताना कारवाई करण्यात आली होती. कामोठे खाडीकिनारीही असेच प्रकार होत असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार या परिसरातही गस्त वाढवून केमिकल टँकरवर कारवाई केली जाणार आहे...



तळोजा एमआयडीसीमधून प्रक्रिया केलेले केमिकलयुक्त सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी कामोठे खाडीजवळ फुटली आहे. त्यामुळे खाडीचे पाणी प्रदूषित झाले आहे. ही वाहिनी बदलण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.


थोडे नवीन जरा जुने