उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )दिनांक 29 एप्रिल 2023रोजी विक्रोळी टागोर नगर येथे धर्मवीर आनंद दिघे सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवसेवा परिषद महाराष्ट्र व आदर्श मुंबई यांच्या वतीने आयोजित 12 वा वर्धापण दिनानिमित्त भारतरत्न गौरव श्री राष्ट्रीय पुरस्कार 2023 चे आयोजन केले होते
यावेळी अनेक विभूतीना पुरस्कार प्रदान करण्यास आला. त्यामध्ये उरण तालुक्याचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय कराटेपटू व शिक्षक गोपाळ दिनकर म्हात्रे (सारडे- उरण )यांना 2023 चा भारतरत्न गौरव श्री पुरस्काराने सन्मानित (क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रा)करण्यात आले.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 150 युवा, युवतींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यां पुरस्कारा चे उदघाटक संपादक डॉ.सुकृतजी खांडेकर यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून वर्षाताई गायकवाड, सुनील राऊत आमदार विक्रोळी, डॉ पवन- आंतराष्ट्रीय व्याखेते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Tags
उरण