परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड कंपनीला स्थानिकांचा विरोध.





परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड कंपनीला स्थानिकांचा विरोध.

कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करण्याची मनसेची रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.



उरण दि. 29 (विठ्ठल ममताबादे )तळोजा मधील सेक्टर नंबर 93 प्लॉट नंबर 31, तळोजा,एम आय डी. सी येथील परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड कंपनीला स्थानिकांनी विरोध केला असून त्या अनुषंगाने सदर कंपनीचे सर्व परवानगी रद्द करावे अशी मागणी करत मनसेचे तालुकाध्यक्ष रामदास पाटील व त्यांच्या शिष्ट मंडळाने रायगडचे जिल्हाधिकारी योगेश मस्के यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.यावेळी पनवेल मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील,उपतालुका अध्यक्ष पनवेल चिंतामणी मुंगाजी, उपतालुका अध्यक्ष पनवेल संजय तन्ना,रस्ते आस्थापना जिल्हा संघटक रमेश पाटील,उपजिल्हा रस्ते विजय ठाकूर, भातान शाखाध्यक्ष सोनी बेबी,कार्यकर्ते कैलास माळी आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






मे.परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड ही कंपनी ज्या जागेत उभारण्यात येत आहे ती जागा ग्रीन झोन होती आणि या जागेत नियमांचे उल्लंघन करून केमिकल झोन करण्यात आले आहे.ग्रीन झोन मधुन केमिकल झोन कन्वर्जन करत असताना तलोजा एम. आय. डी. सी व प्रदूषण नियंत्रण खात्याचे कायद्याचा उल्लंघन करून केमिकल झोन या व्यवस्थापनाने प्राप्त केला आहे. 90 मीटरच्या आत स्थानिक गाव वसाहत आहे. आणि या वसाहत राहणारे 10,000 हजार लोकांचं जीव धोक्यात आहे.


स्थानिक ग्रामस्थांचा ,ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच नगरसेवक, पुढारी यांचा परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड ( S.no. 93, प्लॉट न. 31, तळोजा एमआयडीसी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड)या कंपनीला विरोध आहे. या सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या वरील कंपनीला दिलेल्या सर्व परवानग्या त्वरित रद्द करावे. शासनाने योग्य ती त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


कारवाई न केल्यास एम. आय. डी. सी तळोजा व प्रदूषण नियंत्रण एमपीसिबी कार्यालयावर मनसे तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे .सदर समस्या बाबत मनसे पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे,महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळ मुख्य कार्यालय अंधेरी,रायगड जिल्हा पालक मंत्री उदय सामंत,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी महत्वाच्या ठिकाणी मनसेच्या वतीने पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने