नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लगत असलेल्या गावाला होणारा त्रास थांबवण्यासाठी मनसे आक्रमक.







नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लगत असलेल्या गावाला होणारा त्रास थांबवण्यासाठी मनसे आक्रमक.
पनवेल मध्ये दगड मशीन, क्रेशर मशीन द्वारे कायदयाचे उल्लंघन.
कायदयांचे उल्लंघन थांबविण्याची मनसेची मागणी.




उरण दि 29 ( विठ्ठल ममताबादे ) पनवेल तालुक्यात दगड मशीन, क्रेशर मशीन द्वारे कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असून या कायदयाचे उलंघन थांबवावे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लगत असलेल्या गावाला होणारा त्रास थांबवण्यासाठी मनसे आक्रमक झाली असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय परिसरात बेकायदेशीर कामे करणाऱ्या दगड मशीन, क्रेशर मशीन वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील व त्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हा खान अधिकारी अलिबाग, जिल्हा रायगड श्री. मेश्राम यांच्याकडे केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सिडको, तहसीलदार पनवेल, सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई, राजगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दादर, मुंबई आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून कायद्याचे उलंघण करणाऱ्या क्रेशर मशीन व दगड मशीन मालक चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.







पनवेल तालुक्यात क्रशर आणि खाणी बिनधास्तपणे सुरु आहेत. आणि या क्रशर आणि खाणांनी केलेल्या विषारी अधिवासामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांची बळी जात आहे. या बेकायदेशीरपणे उभारलेल्या स्टोन क्रशर आणि खाणीवर जिल्हाधिकारी कोणतीही कारवाई का करत नाहीत ? असा सवाल मनसे द्वारे उपस्थित करण्यात आला आहे.राष्ट्रीय महामार्गापासून 200 मीटर आणि गावापासून 500 मीटर अंतरावर युनिट उभारले जावे या साइटिंग निकषांचे पालन क्रेशर व मशीण चालकाकडून,मालका कडुन केले जात नाही. त्यांच्याकडे युनिट स्थापन करण्याची परवानगी नाही.



किंवा चालवण्याची संमती नाही, परंतु तरीही ते सुरु आहेत. त्यांच्याकडे कोणाचेही परवानगी नाही. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक महसूल अधिकारी यांची परवानगी नाही. तरीसुद्धा क्रेशर, मशिनी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.दगडी धूळ संपूर्ण पर्यावरण प्रदूषित करत आहे. या प्रदूषित हवेचा परिणाम या भागातील वनस्पती आणि जंगलांवरही होत आहे. विविध खाणकामांमुळे या भागातील जंगलाचे आच्छादन हळूहळू कमी होत आहे. याचा या भागातील हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. उन्हाळ्यात तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. स्टोन क्रशरचा कचराही माती प्रदूषित करतो.




स्टोन क्रेशर आणि कोरीच्या मालकांचा मक्तेदारीमुळे खडीचा भाव 1800 रुपये ब्रास वरून 5000 रुपये ब्रास करण्यात आलेला आहे आणि कश सैंड चा भाव 2200 रुपये वरुन 5000 रुपये करण्यात आलेले आहे, ज्या मुळे बिल्डर यांनी घराचे दर वाढवले आहेत . आणि यात बिल्डर सोबत सामान्य जनतेचा मरण होत आहे तर या संदर्भात शासनाने तातडीने या विषयावर लक्ष द्यावे आणि यावर योग्य ते कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.



 यावेळी पनवेल मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील,उपतालुका अध्यक्ष पनवेल चिंतामणी मुंगाजी, उपतालुका अध्यक्ष पनवेल संजय तन्ना,रस्ते आस्थापना जिल्हा संघटक रमेश पाटील,उपजिल्हा रस्ते विजय ठाकूर, भातान शाखाध्यक्ष सोनी बेबी,कार्यकर्ते कैलास माळी आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने