लोकल रेल्वेत आढळला महिलेचा मृतदेह
लोकल रेल्वेत आढळला महिलेचा मृतदेह

पनवेल दि.२९ (संजय कदम) : बेलापूर रेल्वे स्टेशन उभ्या असलेल्या लोकल गाडीच्या मधल्या लगेज डब्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत.               सदर महिलेचे वय अंदाजे ३५ वर्षे असून उंची ५ फूट, अंगाने सडपातळ, रंग सावळा, डोकीचे केस बारीक काळे, दात शाबूत, नाक बसके तसेच तिच्या डाव्या हाताच्या मनगटावरील बाजूस ‘रोहीत’ असे नांव गोंदलेले आहे. त्याचप्रमाणे अंगात काळया रंगाचे फुलाचे डिझाईन असलेला केसरी रंगाचा फूल बाहयाचा टॉप, निळया रंगाची लेगीज व चॉकलेटी रंगाची निकर घातलेले आहे. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे किंवा सहा. पोलीस निरीक्षक अजित कणसे (मो.९६०७६१४८७६) यांच्याशी संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने