एनएमएमटी बसला झालेल्या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी






एनएमएमटी बसला झालेल्या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी  
पनवेल दि . २८ ( वार्ताहर ) : बसचालकाने त्याच्या ताब्यातील बस एनएमएमटी भरधाव चालवून अचानक वळण घेतल्याने दुचाकी सदर बसला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. बसचालकाविरोधात खारघर पोलिस याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


                 थानसिंग केससिंग राजपुरोहित हे भैरव काळ मंदिराजवळ, पनवेल येथे राहत असून, ते सुतार काम करतात. ते त्यांची मोटरसायकल एमएस ४६ बीएल १८७७ घेऊन खारघर, सेक्टर ३४ या ठिकाणी गेले. काम संपवून ते खारघरकडून करंजाडे या ठिकाणी जाण्याकरिता निघाले असता सीआयएसएफ कॅम्प ओवेगाव चौकीसमोर आले



. यावेळी एनएमएमटी बसने अचानक वळण घेतल्याने सर्व रस्ता अडला गेला. त्यामुळे मोटरसायकल बसच्या खाली मध्यभागी गेली व अडकली. यात त्यांचा पाय बस व मोटारसायकलमध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना नागरिकांनी बाहेर काढले व पुढील उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल केले.


थोडे नवीन जरा जुने