करंजाडेतील चिंचपाडा येथील धूळखात पडलेले नागरी आरोग्य केंद्र पुन्हा सुरु करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी




पनवेल दि.१३ (संजय कदम) : करंजाडे चिंचपाडा परिसरात नागरी आरोग्य केंद्र बांधून तयार आहे. मात्र हे केंद्र काही महिने सुरु झाले. त्यानंतर पुन्हा बंद झाल्याने हा केंद्र धूळखात पडून आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करंजाडे - वडघर विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख मा.आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली वडघर विभागप्रमुख नंदकुमार मुंडकर, करंजाडे युवासेना शहरप्रमुख निखिल भोपी, युवासेना अधिकारी गौरव पांडे, गौरव पाटील हे उपस्थित होते.



              सिडकोने करंजाडे वसाहतीची निर्मिती केली आहे. मात्र आजपर्यंत या वसाहतीला सुविधांची वानवा असल्याचे दिसत आहे. यातच करंजाडे वसाहतीमध्ये नवनव्या समस्यां डोकेवर काढत आहेत. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उभारण्यात सिडको व जिल्हा परिषद अपयशी ठरली आहे. करंजाडे वसाहतीमधील नागरिकांना याचा सतत अनुभव येत आहे. खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घेताना नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे.


 त्यामुळे सिडकोने सुरवातीलाच येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय करणे अपेक्षित होते. मात्र या सुविधेकडे प्राधिकरणाने दुर्लक्षित केले आहे. नागरिकांच्या गैरसोयीचे गाऱ्हाणे हे जुनेच आहे. दरम्यान या ठिकाणी प्राथमिक केंद्र सुरु करावे हि मागणी यापूर्वीचीच आहे. मात्र सिडकोने आरोग्य केंद्र उभारले काही महिने सुरु झाले. आणि तेच आरोग्य केंद्र आता धूळखात पडून आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करंजाडे-वडघर विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर पुन्हा सुरु करावे अशी मागणी केली.


कोट - वडघर आर 2 याठिकाणी सिडकोमार्फत बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र सद्यस्थितीत बंद आहे. सदर आरोग्य केंद्र पुन्हा सुरू व्हावे यासाठी आम्ही पंचायत समिती आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी आरोग्य  अधिकाऱ्यांनी आठवड्यातुन तीन दिवस डॉक्टर उपस्थित असतील असे आश्वासन आम्हाला दिले असून सदर गोष्टींचा पाठपुरावा युवासेना करंजाडे च्या मार्फत सतत घेतला जाईल. - निखिल भोपी (करंजाडे युवासेना शहरप्रमुख)



थोडे नवीन जरा जुने