शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेनेच्या डॉक्टर पथकाने घेतली उष्माघाताने उपचार घेत असलेल्या श्री सेवकांची भेट







शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेनेच्या डॉक्टर पथकाने घेतली उष्माघाताने उपचार घेत असलेल्या श्री सेवकांची भेट

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभाताई राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर महाराष्ट्र समनव्यक जितू सकपाळ यांच्या सूचनेनुसार आज खारघर येथे उष्माघाताने जे श्री सेवक एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथे उपचार घेत आहेत, त्यां श्री सेवकांची भेट घेऊन विचारपुस केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून पुढिल उपचारासंदर्भात माहिती घेतली.


शिव आरोग्य सेनेचे पनवेल महानगर समनव्यक डॉ परेश देशमुख, नवी मुंबई विभागीय समन्वयक प्रविण वागराळकर, ऐरोली आरोग्य संघटक अक्षय गोरे, बेलापूर आरोग्य संघटक राकेश यादव, समनव्य सचिव संकेत मोरे, समनव्य सचिव अनिरुद्ध नरुटे, समनव्य सचिव रोहित शिरसट, समनव्य सचिव युगांतर लोखंडे, समनव्य सचिव संतोष पांचाळ, समनव्य सचिव राजेश काळे, सौ निकिता देवरे व शिवसैनिक उपस्थित होते. तसेच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  खासदार राजन विचारे, माजी जेष्ठ नगरसेवक एम के मढवी तसेच  रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, 




पनवेल महानगर समन्वयक दीपक घरत, योगेश तांडेल, उप महानगरप्रमुख प्रकाश गायकवाड, शहर प्रमुख खारघर  गुरुनाथ  पाटील, उप जिल्हाप्रमुख नवी मुंबई मनोज हळदणकर, शहर प्रमुख नवी मुंबई प्रवीण म्हात्रे इत्यादी रायगड पनवेल नवी मुंबई विभागातील शिवसेना पदाधिकार्‍यांची  शिव आरोग्य सेनेचे नवी मुंबई आणि पनवेल महानगरच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेना रायगड मध्यवर्ती कार्यालय बेलपाडा खारघर येथे भेट घेतली व रुग्णांवर उपचारा संदर्भात माहिती दिली.


 ः
थोडे नवीन जरा जुने