महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगतीमार्गावर मागील तीन महिन्यात अपघातांमध्ये लाक्षणिक घट; वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या एकुण ३४९७२ वाहनांवर धडक कारवाई*महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगतीमार्गावर मागील तीन महिन्यात अपघातांमध्ये लाक्षणिक घट; वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या एकुण ३४९७२ वाहनांवर धडक कारवाई
पनवेल दि.१८(संजय कदम): महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगतीमार्गावर मागील तीन महिन्यात अपघातांमध्ये लाक्षणिक घट तर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या एकुण ३४९७२ कसुरदार वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये केली धडक कारवाई करण्यात आली आहे.राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता संजय कुमार वर्मा अपर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, रायगड परिक्षेत्र, संदीप भागडीकर पोलीस उप अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड विभाग तसेच गौरी मोरे पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गणेश बुरकुल, प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन, धोकादायक ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळल्यामुळे झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणामध्ये घट होण्याकरीता महामार्गावरील नेमुण दिलेल्या विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या चालकांवर योग्य ती कार्यवाही करुन सदर चालकांचे प्रबोधन करून यापुढे त्यांचेकडुन अशा चुका भविष्यात होणार नाहीत व त्यांचेकडुन यापुढे नियमांचे पालन होईल व अपघात कमी होण्यास मदत होईल याबाबतची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे

. पळस्पे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहन चालक मालक तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियमांबाबत जनजागृती व्हावी व वाहतुकीचे नियमांचे पालन करण्यात यावे याकरीता महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचेमार्फतीने द्रुतगती महामार्गावर वाहनांमध्ये अपघात कमी व्हावे, महामार्गावर वाहतुक सुरळीत चालावी अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुक नियमांबाबत जनजागृती व्हावी याकरिता वेळोवेळी जनजागृतीपर चौकसभा आयोजीत करुन वाहन पार्किंग स्थळे, कळंबोली ट्रक टर्मीनल, लॉजीस्टीक्स, खालापुर टोलनाका येथे विविध प्रबोधनकार कार्यक्रम घेवुन वाहतुक नियमांबाबतच्या माहिती पत्रके वाटून वाहनचालकांना अपघात समयी मदत करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. तसेच उल्लंघन केलेल्या बेसिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे तर्फे आयोजीत रस्ता सुरक्षा अभियान २०२३ च्यादरम्यान जनजागृतीपर राबविण्यात आलेल्या मोहिमेला मोठे यश प्राप्त झालेले असुन महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीतील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मागील ३ महिन्यात प्राणांतिक व गंभीर अपघातामध्ये लाक्षणिक घट झालेली आहे. माहे जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीमध्ये महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीतील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लावण्यात आलेल्या स्पीड कॅमरा तसेच इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगनद्वारे वेग मर्यादेचे उल्लंघन करणा-या एकुण २७०७० वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरवी विना हेल्मेट ३५२, विना सिटबेल्ट ३०३, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे ३५५, विना परवाना वाहन चालविणे ४८, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे ५८९, नो इन्ट्री व सुचना फलकांचे पालन न करणे ५०५८, नंबर प्लेट १२० व इतर उल्लंघन १०७७ याप्रमाणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकुण ३४९७२ कसुरदार वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे अधिकारी व अंमलदार यांचेकडुन वेळोवेळी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहणांवर दंडात्मक कारवाई तसेच वाहन चालकांचे करण्यात आलेले प्रबोधन यामुळे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे हददीत अपघातामध्ये माहे जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये माहे जानेवारी ते मार्च २०२२ च्या तुलनेत ७५ % अपघात कमी झालेले दिसुन येत आहेत. असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश बुरकुल यांनी सांगितले आहे.थोडे नवीन जरा जुने