सकल मराठा समाज खांदा कॉलनी आयोजित मराठा चषक २०२३ चा ‘साई इलेव्हन’ संघ ठरला मानकरी





सकल मराठा समाज खांदा कॉलनी आयोजित मराठा चषक २०२३ चा ‘साई इलेव्हन’ संघ ठरला मानकरी
पनवेल दि.१८ (संजय कदम) : सकल मराठा समाजाचा बुलंद आवाज व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा "मराठा चषक २०२३" चे आयोजन महात्मा शाळा मैदान खांदा कॉलनी येथे करण्यात आले होते. साई इलेव्हन विरुद्ध साईराज बी या दोन संघामध्ये रंगलेल्या अंतिम रोमहर्षक लढतीत साई इलेव्हन संघ विजयी ठरला. विजेत्या संघास सकल मराठा समाज खांदा कॉलनीचे सचिव व शिवसेना खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या शुभहस्ते १५ हजार रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.



                          खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन देणे या उदांन्त हेतूने सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा "मराठा चषक २०२३" चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खांदा कॉलनी मधील १२ संघांनी सहभाग नोंदवला. यास्पर्धेत साई इलेव्हन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर १० हजार रुपये रोख व आकर्षक चषकाचा द्वितीय पारितोषक साईराज बी या संघाला मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक व अथर्व ट्रेडिंग कंपनी चे सर्वेसर्वा ओंकारशेठ गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


 तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५ हजार रोख व आकर्षक चषक मराठा ज्वेलर्स खांदा कॉलनी चे मालक सुभाषशेठ मुळीक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारा साईराज ए संघाचा प्रसाद कापणे याला मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक व शिवसेनेचे उपमहानगर संघटक शिवजीशेठ दांगट यांच्या शुभहस्ते कुलर व आकर्षक चषक देऊन मालिका वीर पुरस्कार, उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई इलेव्हन संघाचा खेळाडू प्रमोद जाधव याला मराठा समाजाचे नेते




 बाळासाहेब खोसे यांच्या कडून बॅट व आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज साईराज बी संघाचा संजय मत्रे(बारक्या) याला परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या तर्फे शूज व आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून साईराज बी संघाचा विजय मुंढे याला सोनाई मेडिकलचे विक्रम जगताप यांच्यातर्फे स्मार्ट डिजिटल वोच व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी खांदाकॉलनी सह पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर मधील क्रीडा प्रेमी उपस्थित होते. स्पर्धेचे आभारप्रदर्शन आयोजक संतोष जाधव यांनी केले.



थोडे नवीन जरा जुने