शांतता आणि सलोखा राखत रमजान ईद आणि अक्षयतृतीया साजरी करा

शांतता आणि सलोखा राखत रमजान ईद आणि अक्षयतृतीया साजरी करा - सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत सोनावणे  
पनवेल दि.२१ (संजय कदम) : रमजान ईद आणि अक्षय तृतीया सणानिमित्त निमित्त पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील मशीद ट्रस्टी व मौलाना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भागवत सोनावणे यांनी उपस्थितांना सूचनापर मार्गदर्शन करून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 


 
 या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्यासह पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गोपनीय व पासपोर्ट विभागाचे सहाय्यक फौजदार संजय धारेराव, पोलीस हवालदार गौतम भोईर, पोलीस नाईक भाऊसाहेब लोंढे, पोलीस नाईक किरण सोनावणे यांच्यासह शहरातील मशीद ट्रस्टी व मौलाना, शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, आगामी येणारे रमजान ईद आणि अक्षय तृतीया सण सर्वांनी उत्साहात साजरे करा मात्र हे करताना शहरात शांतता व सलोखा राखा


. यादरम्यान कोणीही आक्षेपार्ह पोस्टर्स/ बॅनर लावू नका तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल असे भाषण करू नका. असे करताना कोणी आढळ्यास त्वरित पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे सध्या सोशल मीडियाचे युग आहे. आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजकंटकांकडून चुकीचे संदेश, अफवा पसरविण्याच्या प्रकारात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अश्या अफवांवर विश्वास ठेवू नका व सोशल मीडियावर/ व्हाट्सअपवर काही आक्षेपार्ह विधानबाबत माहीती मिळाल्यास पोलिसांना याबाबतची माहिती द्या. तसेच परिसरात आक्षेपार्ह वस्तू, वाहने, इसम, इत्यादी आढळून आल्यास त्वरित पोलीस ठाण्याची संपर्क साधा असे सूचनापर मार्गदर्शन करून रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.थोडे नवीन जरा जुने