पनवेल कृषी बाजार समिती संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ ललिता गोपीनाथ फडके यांचा करण्यात आला सत्कार

पनवेल कृषी बाजार समिती संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ ललिता गोपीनाथ फडके यांचा करण्यात आला सत्कार
पनवेल दि.२१ (संजय कदम) : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदी महाविकास आघाडीच्या सौ ललिता गोपीनाथ फडके ह्या बिनविरोध निवडून आल्या आहे. यानिमित्त माजी सरपंच गोपीनाथ फडके यांच्या मित्रमंडळींकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.  पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदी महाविकास आघाडीच्या सौ ललिता गोपीनाथ फडके ह्या बिनविरोध निवडून आल्या आहे. यानिमित्त परशुराम जीतेकर, बाळासाहेब नाईक, शशिकांत जितेकर, विलास करावकर, प्रभाकर पाटील, गुरुनाथ भोपी, चंद्रकांत पाटील, जांदा पाटील, सुनील भगत, विष्णू उद्धार आदी मित्रमंडळींनी सौ ललिता गोपीनाथ फडके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या निवडणुकीत १८ जागांपैकी १७ जागेंवर महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे.थोडे नवीन जरा जुने