एकटपाडा येथे घरफोडीत सव्वा २ लाखाचा ऐवज लंपास

एकटपाडा येथे घरफोडीत सव्वा २ लाखाचा ऐवज लंपास
पनवेल दि.२१ (संजय कदम) : घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील एकटपाडा येथील विशाल हाईट्स इमारतीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे


               तालुक्यातील एकटपाडा गाव येथील विशाल हाईट्स इमारतीत राहणाऱ्या सुवर्णा आप्पाराव कांबळे यांच्या घरात रात्रीच्या वेळी कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र २५ ग्रॅम, ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचा हार १५ ग्रॅम, ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमका १० ग्रॅम, १० हजार रुपये किमतीचे सोन्याची अंगठी २.५ ग्रॅम, 4 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पान १ ग्रॅम, ४ हजार रुपये किमतीचे सोन्याची नथ, २ हजार चारशे रुपये किमतीचे चांदीचे पैजण ६ लोळे, बाराशे रुपये किमतीचे चांदीचा छला ३ तोळे, ३ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख २४ हजार सहाशे रुपये किंमतीचे ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने