शीर्षक नाही

*पनवेलमध्ये ‘माझे घर आणि स्वयंपाकघर’ द्वारे उलगडणार अन्नाचा प्रवास* 
पनवेल दि.२१ (संजय कदम) : मने आणि माणसे जोडण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात आणि पोटात जाणाऱ्या अन्नाचा प्रवास शेतातून सुरु होतो...तो कसा? तर ते उलगडून दाखवण्यासाठी ‘माझे घर आणि स्वयंपाकघर’ कार्यक्रम रविवार ३० एप्रिल रोजी सांयकाळी ४ वाजता पनवेल शहरातील गोखले सभागृहातआयोजित करण्यात आला आहे.
 या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या कृषी पर्यटन संकल्पनेच्या शिल्पकार प्रा. अनुराधा भडसावळे ह्या उपस्थितांना आपल्याशी सगुणा बाग या संकल्पनेविषयी संवाद साधणार आहेत. तर खरेदीतील मर्म आणि बारकावेमधील सादरकर्त्या छाया वारंगे ह्या दररोज स्वयंपाकगृहात वापरल्या जाणाऱ्या विविध घटक पदार्थाच्या खरेदीतील रहस्ये उलघडून त्यांची खरेदी चोखंदळ कशी करावी ह्याबाबतीत उपस्थितांशी मोकळेपणाने सुसंवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य व खुला असून गृहीणी, कॅटरर्स, खवय्ये, डॉक्टर, वाण सामान विक्रेते, तयार खाद्यपदार्थाचे व्यापारी अशा अनेकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे बौद्धीक मेजवानी देणारा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सगुणा बाग कृषी उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री हे खास आर्कषण ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी डॉ. पराग काळण (मो. ९८२०१४२३३३), सौ. अस्मिता काळण (९८३३२२२११०), सौ. मुग्धा काळे (मो. ९०२११६११८५), गणेश कडू (९९६७२५०००७) किंवा मंजिरी काळे (मो.९८६९६५२७३३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने