उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील ग्रामपंचायत भेंडखळ या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मंजिता मिलिंद पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सन्मानिय सदस्य यांना विश्वासात घेऊन भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत विधवा महिला करिता एक विशेष कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवून त्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 15 % मागासवर्गीय इतर खर्चातून निधी वाटप करण्याचे ठरले व त्यानुसार प्रत्येक विधवा महिलेस आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या फंडातून दिनांक 17/04/2023 रोजी एक ऐतिहासिक उपक्रम राबवून ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक विधवा महिलेस वार्षिक रक्कम रुपये 6000/- इतकी रक्कम अनुदान रूपाने देऊन गावातील अशा एकूण 172 विधवा व निराधार महिला वर्गाला गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास सरपंच मंजिता मिलिंद पाटील, उपसरपंच संगीता मेघश्याम भगत, ग्रामपंचायत सदस्य अजित वासुदेव ठाकूर, दिपक दामोदर ठाकूर, अभिजित देवानंद ठाकूर, लिलेश्वर गजानन भगत,स्वाती महेंद्र घरत, सोनाली कौस्तुभ ठाकूर, शितल जीवन ठाकूर, स्वाती संतोष पाटील, अक्षता अनिल ठाकूर, श्रीमती. प्राची गणेश पाटील व ग्रामविकास अधिकारी दिलीप महादेव तुरे, ग्रामपंचायत कर्मचारी निशा प्रफुल्ल वशेणीकर, श्रीमती. हेमलता यशवंत मते या मान्यवरांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
भेंडखळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून विधवा महिलांना आर्थिक आधार देणारी भेंडखळ ग्रामपंचायत ही रायगड जिल्हयामधील उरण तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीच्या पाहिल्याच निर्णयाने दुर्बल घटकांना आधार मिळवून दिल्याबद्दल भेंडखळ ग्रामपंचायतीवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags
उरण