मा. नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण





जय महाराष्ट्र...! 
शिवसेना पनवेल महानगरप्रमुख,*मा. नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण* यांच्या पुढाकाराने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सावरकरांच्या विचारांचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते, अभ्यासक यांची बैठक बोलावली. 



यावेळी ज्येष्ठ सावरकर अभ्यासक दुर्गेश परुळकर, सच्चिदानंद शेवडे सर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, युवा व्याख्याते वैद्य परीक्षित शेवडे, पार्थ बावस्कर, ॲड.श्रीराम ठोसर, अनिल गानू, विनोद सातव, मा. श्री. सचिन जोशी इ. मान्यवर उपस्थित होते. स्वा.सावरकरांचा त्याग अतुलनीय असून त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यास आणि त्यांच्यावरील खोट्या आरोपांचे सप्रमाण खंडण करण्यासाठी अभियान अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तुमच्या मागे उभी करू असे



 आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिले. पनवेल मधील प्रथमेश सोमण विश्वस्त असलेल्या ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त देवस्थानाला भेट देण्याचे आमंत्रणही दिले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर जोशी, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, अभिनय सोमण उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने