शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मनसे पक्षातील पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश
पनवेल, दि ०९ ( संजय कदम) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खारघरसह परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला असता त्यांचे स्वागत रायगड, पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी शिवबंधन बांधून केले.


        खारघरसह परिसरातील मनसे चे वॉर्ड क्रमांक - 141 चे शिवाजी नगर मुंबई येथील शाखा अध्यक्ष रुपेश शर्मा त्यांच्या सहकाऱ्यांनी आज खारघर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यलयामध्ये रायगड, पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला. यावेळी महानगर संघटक शशिकांत डोंगरे , खारघर शहर प्रमुख गुरुनाथ लिलाधर पाटील यांच्या प्रयत्नाने हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. 
थोडे नवीन जरा जुने