भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गडब बौद्धवाडी येथे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार साजरी

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गडब बौद्धवाडी येथे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार साजरी
पनवेल दि.२९ (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हे 30 एप्रिल रोजी गडब बौद्धवाडी पेण येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महेश साळुंखे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गडब विभागातील कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये दामोदर काकडे यांच्या नेतृत्वाखाली तरूण कार्यकर्त्यांचा लवकरच जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.                 त्याचप्रमाणे २८ एप्रिल रोजी महाड येथील कार्यकर्त्यांनी महेश साळुंखे यांची भेट पनवेल येथे घेतली व पक्षांमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. या चर्चेत आनंद पवार, रविंद्र साळवी, सुजीत जाधव, सुरेश धोत्रे, सुनील जाधव, सिद्धांत साळवी, महेंद्र जाधव, दिलीप धोत्रे, इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.


 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी चे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब ईंदीसे व युवा राष्ट्रीय नेते भय्यासाहेब ईंदीसे यांच्या नेतृत्वाखाली येत्या ६ मे रोजी शास्त्रीनगर ठाणे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव आयोजित केला आहे. महेश साळुंखे या जयंती महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ८ मे रोजी महाड येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महेश साळुंखे मार्गदर्शन करणार आहेत.थोडे नवीन जरा जुने