तळोजा गावामधील तलावाचे सुशोभीकरणाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकदारावर कारवाई करावी : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहबाज पटेल यांची महापालिकेकडे मागणी*
मात्र ठेकेदाराने सदर कामे हि अत्यंत खराब केली दर्जाची असून यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या कामाची पाहणी करून चौकशी करावी व तात्काळ ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
.सिमेंट काँक्रेट मध्ये दगड,माती, गोटे याचा वापर करण्यात आला आहे म्हणूनच या भिंती ढासळल्या आहेत.या कामाचे संबधित ठेकेदाराचे बिल ही अदा करू नये तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे यामध्ये जे कोणी सामील आहेत त्यांच्यावर सुद्धा करावी व्हावी अशी मागणी स्थानिक जनता करीत आहेत. कोट्यवधी रुपये निधी खर्चून जर का असे काम होत असेल तर नक्कीच यामध्ये गडबड असावी असा समज नागरिकांचा झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबधित अधिकारी व ठेकेदार आणि सामील असलेले लोकांवर कारवाई करावी अन्यथा लवकरच तळोजा येथे जनआंदोलन उभारण्यात येईल याला सर्व प्रशासन जबाबदार असेल असेही शहाबाज पटेल म्हटले आहे.
पनवेल दि.२९ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून तळोजा येथील गावातील असणारे तलावाचे सुशीभीकरणाचे काम सुरु केले.
मात्र ठेकेदाराने सदर कामे हि अत्यंत खराब केली दर्जाची असून यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या कामाची पाहणी करून चौकशी करावी व तात्काळ ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात शहाबाज पटेल यांनी म्हटले आहे कि, काही दिवसापूर्वी पनवेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून तळोजा येथील गावातील असणारे तलावाचे सुशीभीकरणाचे काम सुरु केले. पुढे येणाऱ्या निवडणूकेला सामोरे कसे जायचं म्हणून या कामाची मंजुरी घेतली व कामास सुरवात झाली.आता ५०% हुन अधिक काम केले असून हे काम अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. आज केलेल्या कामाच्या भिंती ढासळल्या आहेत त्यामुळे गावातील लोकांमध्ये असंतोष पसरला असून लोकांनी चालू असलेले काम बंद पाडले आहे.संबधित काम अधिकाऱ्यांनी मूल्यांकन न करता केले आहे, त्यामुळे या कामात गोलमाल झाला असावा हे सुद्धा नाकारता येत नाही

Tags
पनवेल