स्पीडी मल्टीमोडस लि.कंपनी मध्ये वेतन वाढीचा करार संपन्न.









स्पीडी मल्टीमोडस लि.कंपनी मध्ये वेतन वाढीचा करार संपन्न.




उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )हिंद भारतीय जनरल सेनेचे अध्यक्ष निलेश आप्पा पराडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेचे सरचिटणीस दत्तात्रय अ. तांडेल यांच्या मार्गदर्शनखाली तसेच संघटनेचे न्यायालयीन कामकाज सचिव प्रदिप कदम यांच्या समपुदेशनाखाली आणि संघटनेचे चिटणीस बाळासाहेब साबळे यांच्या सहकार्याने दिनांक 28/04/2023 रोजी कामगार उप आयुक्त कार्यालय पनवेल येथे सहाय्यक कामगार आयुक्त शितल कुलकर्णी यांच्या समक्ष वेतन वाढ करार संपन्न झाला.



 सदर करार करण्याकरीता स्पीडी मल्टीमोडसचे युनिट अध्यक्ष तुकाराम कडू आणि त्यांचे सह पदाधिकारी अजय ठाकुर,हेमंत घरत, मोरेश्वर घरत,मच्छींद्र कडू, प्रमोद कडू,संजय ठाकुर,जयेंद्र घरत,नारायण तांडेल यांचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे स्थानिक शिवसेना नेते दिपकजी भोईर यांचेही विषेश सहकार्य लाभले.व्यवस्थापनाच्या वतीने प्रविण पाटिल (एच आर हेड )आणि राकेश कोळी यांनी कामकाज पाहिले.




थोडे नवीन जरा जुने