पनवेल दि . २८ (संजय कदम ) : पनवेल शहरातील जैन स्थानक, कापड बाज़ार येथे ३० एप्रिल ते १० में पर्यंत विपश्यना ध्यान साधना निवासी शिबिर आयोजित केले आहे .
पूज्य गोयेंकाजींनी सम्पूर्ण विश्वात या ध्यान पद्धतिचा प्रसार केला. इगतपूरी , सी वुड अशा अनेक ठीकाणी शिबिर होत असतात . पनवेलकरांच्या सोयीसाठी प्रथमच पनवेल मधे शिबिर होत आहे . सदर चे शिबिर सम्पूर्ण नि:शुल्क असुन दानदात्यांच्या सहयोगातून शिबिराचा खर्च चालतो .शिबिरात फ़क्त पुरुषांनाच प्रवेश आहे
. मोबाइल जमा करुन १० दिवस तेथेच रहावे लागेल . आयोजका तर्फे नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आहे .२९ एप्रिल पर्यंत आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी
सुनील नखाते 9892723134, निकेश कासारे 9699937134 या क्रमांकावर संपर्क साधावा .
Tags
पनवेल