पनवेल महानगरपालिका संघटक मंगेश रानवडे यांनी केली मागणी






*निधी अभावी रखडलेला खारघर मधील अंतराष्ट्रीय पातळीचा रक्त सक्रमण पतपेढी व प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरु करण्याची शिवसेना पनवेल महानगरपालिका संघटक मंगेश रानवडे यांनी केली मागणी*
पनवेल दि.२८(संजय कदम): खारघर मधील अंतराष्ट्रीय पातळीचा 13 कोटी खर्च करून उभारलेले रक्त सक्रमण पतपेढी व प्रशिक्षण केंद्र निधी अभावी रखडलेला आहे.त्यामुळे सदर प्रकल्प पुन्हा सुरू करावा अशी मागणी शिवसेनेचे पनवेल महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी सचिव संजय मोरे यांना दिले निवेदनाद्वारे केली आहे.



खारघर शहरामध्ये राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत महाराष्ट्र रक्तसंक्रमण प्रबोधिनी संकुल नावाची आंतरराष्ट्रीय व देशातील पहिली अशी शासकीय अत्याधुनिक व प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध अशी पाच मजली भव्य वास्तु धूळखात उभी आहे. सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून ही वास्तू पूर्णतः बांधून तयार आहे. मात्र ही वास्तू अजूनही कार्यान्वित झालेली नाही. मागील शासन काळात पीपीपी तत्त्वावर ही संस्था खाजगी कंत्राटदारास चालवण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. 


त्याअंतर्गत आज शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका संघटकमहानगर संघटक मंगेश रानवाडे यांनी शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती पत्र दिले. यामध्ये त्यांनी, सदर वास्तू पूर्णतः तयार असून फक्त अवघ्या ४ ते ५ कोटींच्या निधी अभावी गेल्या एक वर्षापासून बंद स्थितीत आहे जर हा निधी सदर संस्थेस प्राप्त झाला तर या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळेल असे नमूद केले आहे. याबबाबत मंगेश रानवडे यांनी सदर प्रकल्प चालू झाल्यास याचा फायदा रायगड जिल्ह्यातील व आजूबाजच्या जिल्हयातील जनतेला होईल व यासाठी ते लवकरच मुख्यमंत्रीची ही भेट घेऊन सदर बाबी साठी पाठपुरवठा करणार असल्याची माहिती दिली.



थोडे नवीन जरा जुने