वंचित बहुजन आघाडी उरण तालुका अध्यक्ष पदी तुकाराम खंडागळे






उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )अलिबाग वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यालय येथे वंचित आघाडी चे जिल्हाअध्यक्ष प्रदिप ओव्हाळ व वंचित आघाडी जिल्हा महासचिव वैभव कैदारी व कर्जत तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धर्मेंद मोरे व जिल्हा कार्यकारणी यांच्या उपस्थित उरण तालुका अध्यक्ष पदी स्वाभीमानी चळवळीचे शिलेदार तुकाराम खंडागळे यांची निवड करण्यात आली.


 पक्षाचे काम पुढील काळात उरण तालुक्यात जोमाने वाढवेन, पक्षाचे कार्य व विचार तळागाळात पोहोचवीन. पक्षाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. पक्षाचे काम एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे करेन असे तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे यांनी यावेळी सांगत सर्वांचे आभार मानले. 


यावेळी भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका अध्यक्ष अमोल शेजवळ,कुणाल गायकवाड ,संदानंद सकपाळ,भागवत भुताळे,कमलेश चौधरी,जगन सांगळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.बहुजन चळवळीतील कट्टर, एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित असलेले तुकाराम खंडागळे यांची तालुकाध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


थोडे नवीन जरा जुने