ग्रामपंचायत वेश्विचे सरपंच संदीप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झालेले असूनही कारवाई करण्यात जिल्हाधिकारी रायगड यांची दिरंगाई
सरपंच संदीप कातकरी यांस तीन अपत्ये असल्याचा गट विकास अधिकारी आणि तहसीलदार उरण यांचा स्पष्ट अहवाल सादरजनतेची दिशाभूल करून शासन नियम धाब्यावर बसवून सरपंच पदाचा गैरवापर करणाऱ्या संदीप कातकरी वर तातडीने कारवाईची मागणीमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मुंबई अधिनियम क्र 3 चे कलम 14(1) ज नुसार कारवाईस पात्र
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील वेश्वी ग्राम पंचायत येथील सरपंच संदीप कातकरी हे अनुसूचित जमाती प्रवर्ग मधील राखीव मतदार संघातून फेब्रुवारी 2022 मध्ये निवडून आले आहेत. ज्या वेळेस त्यांनी निवडणुकीसाठी नॉमिनेशन फॉर्म भरला त्या वेळेस त्यांना दोन अपत्ये होती. त्यातील पहिले अपत्य संजना संदीप कातकरी ( मुलगी) हे दिनांक 12/01/2009 चाणजे तालुका उरण येथे झाला असून त्याचा जन्म दाखला ग्राम सेवक यांनी दिलेला आहे.दुसरे अपत्य देवेंद्र संदीप कातकरी ( मुलगा) हा दिनांक 18/08/2011 रोजी जन्माला आला असून ग्राम सेवक वेश्र्वि यांनी जन्म दाखला दिलेला आहे. 
तिसरे अपत्य याचे नाव ठेवले नसल्याने त्याचे नावाची माहिती नाही परंतु जन्म दिनाक 26/09/2022 रोजी वासांबे ग्राम पंचायत तालुका खालापूर येथे जन्म झाल्याची नोंद ग्राम सेवक यांनी दिलेली आहे.


हे स्वतः विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार उरण यांनी दिनांक 16/02/2023 रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अहवालात स्पष्ट नमूद आहे. ही केस एवढी सूर्य प्रकाशा एवढी स्पष्ट असतानाही उगाचच दिरंगाई केली जात आहे.


सरपंच संदीप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याने ते आत्ता त्या पदासाठी अपात्र ठरत आहेत. अश्या केसेस फार गांभीर्याने घेतल्या गेल्या पाहिजेत कारण लोकांना खोटी माहिती देवून त्यांची फसवणूक होत आहे. प्रशासकीय अधिकारी यांनी अशी दिरंगाई केल्यावर अश्या खोट्या लोक प्रतिनिधींचे आणखीच फावते, त्यांना वाटते माझा पाच वर्षाचा कार्यकाळ संपे पर्यंत काही होणार नाही. आणि चुकीची माहिती देवून ही ताठ मानेने समाजात वावरताना दिसतात. वेश्वि गावातील निवृत्त शिक्षक गोपाळ पाटील यांना ही बाब लक्षात आल्यावर दिनांक 06/12/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला


. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही हे दिसल्यावर स्वतः पाठ पुरावा केल्यामुळे गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांचा अहवाल दिनांक 16/02/2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात यश आले.त्यात संदिप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याचे गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अहवालातून स्पष्टपणे कळविले आहे. तरीही सरपंच संदिप कातकरी यांच्यावर कोणतेही कारवाई होताना दिसून येत नाही.


थोडे नवीन जरा जुने