शीर्षक नाही

कामोठे शिवसेना शहर प्रमुख सुनील गोवारी यांच्या प्रयत्नामुळे क्रिटिकल लाईफ लाईन हॉस्पिटल ने एक प्रसूती झालेल्या आदिवासी रुग्णाचे महीलाचे चाळीस हजार बिल माफ करून घेतले. 

खोपोली पासून दुर्गम खेड्यातून एक आदिवासी कुटुंब त्याच्या पत्नीला प्रसूती साठी कामोठे येथील क्रिटिकल लाईफ लाईन हॉस्पिटल मधे 
ऍडमिट केले होते त्यावेळेस नोरमल बाळंतपण होऊन सुद्धा हॉस्पिटलने तब्बल नव्वद हजाराचे बिल आदिवासी कुटुंबावर लादले त्यामुळे ते आदिवासी कुटुंब भेदरले आता येवढे पैसे कुठून आणणार त्यामुळे त्या गरोदर महिलेचे पती चिंतेत पडले व त्यांनी हॉस्पिटल च्या प्रशासनाला विनंती केली की बिल खूप झाले कमी करा आम्ही गरीब येवढे पैसे कुठून आणणार पण हॉस्पीटल चे प्रशासन ऐकण्यास तयार नव्हते शेवटी त्यांना कोणीतरी सांगितले तुम्ही शिवसेना कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी यांना जावून भेटा. मग त्या रुग्णाचे सर्व नातेवाईक सुनील गोवारी यांना भेटले व सर्व परिस्थिती कथण केली. त्यांची लगेच दखल घेवून सुनील गोवारी सर्व शिवसैनिकाना घेवून हॉस्पिटल प्रशासनाला भेटले, त्यांना समजून सांगितले बिचाऱ्या आदिवासी लोकांना येवढे बिल नका लावू गरीब आहेत बिचारे. त्या नंतर हॉस्पिटल प्रशासनाने सुनील गोवारी यांचे म्हणणे मान्य करून नव्वद हाजारापैकी चाळीस हजार कमी केले व फक्त पन्नास हजारावर बिल भरण्यास सांगितले अश्या तऱ्हेने सुनील गोवारी यांच्या प्रयतनांमुळे एक आदिवासी कुटुंबाला सहकार्य मिळाले त्या बद्दल त्यांनी सुनील गोवारी यांचे आभार मानले .
थोडे नवीन जरा जुने