अपघातात तिघे जण जखमी

अपघातात तिघे जण जखमी
पनवेल दि . २८ ( वार्ताहर ) : भरधाव वेगाने रिक्षा चालवून ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक मारल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                    मोहम्मद नसीम जमील अहमद खान हे नेवाळी गाव येथे राहत असून, ते दुचाकीवरून नेवाळीगाव येथून टेंभोडे ब्रिजकडे जाणाऱ्या रोडने नवीन पनवेलला जात होते.

 अष्टविनायक ढाब्याच्या समोरील रस्त्यावर काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षाचालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा ही एका अज्ञात वाहनास ओव्हरटेक करत असताना त्यांच्या स्कुटीला बाजूस धडक दिली. या अपघातात पत्नी स्नेहल, मुलगी ईकरा व मोहम्मद हे तिघेही खाली पडले व ते जखमी झाले.


थोडे नवीन जरा जुने