मैत्री कट्टा फणसवाडी" पिरकोन यांची साफ- सफाई मोहीम..








उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )"जल है तो कल है " या गोष्टीचं महत्व जाणून पूर्वज्यांनी त्या काळी आप- आपल्या गावी विहिरी खोदून वर्षभर पाणी पुरेल या हेतूने खोलवर विहिरी खोदल्या आणि त्या पक्क्या-बांधल्या पुढे त्यातूनच वर्षभर पिण्याचे पाणी वापरत आपला जीवन प्रवाह चालू ठेवला. कालांतराने आपल्याकडे सरकारी योजनेचा च्या माध्यमातून धरणावाटे पाणीपुरवठा सुरू झाला. 


त्या कारणाने विहिरी ही ओस पडल्या. अन त्याकडे दुर्लक्ष ही झाले ,पण आज ना उद्या याची ही गरज पडू शकेल ? उद्या या विहिरींची नक्की गरज भासू लागली तर....? या उद्देशाने या विहिरींची साफ- सफाई आणि गावातून विहिरींपर्यंत जाण्यासाठी असणारा रस्ता याची साफसफाई करणे गरजेचे आहे



. या विचाराने उरण तालुक्यातील पिरकोन गावाची "मोठी विहीर" नावाने सुप्रसिद्ध असलेली "मोठी विहीर" अर्थात "मोठी बाव" आणि परिसराची साफसफाई "फणसवाडी मैत्री कट्टा" परिवार पिरकोन यांच्या श्रमदानातून करण्यात आली. सूर्यकांत गावंड, विलास गावंड, मंगेश म्हात्रे, राजा जोशी, प्रमोद जोशीं,प्रवीणजोशी ,अभि पाटील, बाबू पाटील, विलास पाटील, केतन गावंड, सूरज घरत,प्रशांत गावंड, यतीश गावंड, प्रतीक घरत, आणि विनायक गावंड आदी मैत्री कट्टा फणसवाडीचे पदाधिकारी सदस्य यांनी आपला अमूल्य वेळ देऊन साफसफाई करून सदर मोहीम यशस्वी केली.


थोडे नवीन जरा जुने