पनवेल दि.०२ (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव सहकार सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कळंबोली येथील ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश चांदिवडे यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोली वसाहतीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्य करणारे तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना व पतपेढीच्या माध्यमातून समाजात कार्यरत असणाऱ्या प्रकाश चांदिवडे यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी सोबत त्यांची नियुक्ती शिवसहकार सेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान शिव सहकार सेनेच्या अध्यक्षपदी शिल्पा सरपोतदार यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश शिरवाडकर, संदीप तांबे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
Tags
पनवेल