पनवेल दि.२२ (संजय कदम) : मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान ईद आज भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या ईदनिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
पनवेल परिसरात आज मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव ईद साजरी करताना दिसत आहेत. यानिमित्त एकविरा आई झोपडपट्टीसह शहरातील अनेक ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला अध्यक्षा ममताज पठाण, फातिमा मुल्ला, खुशबू मुल्ला खान, अरबाज अन्सार पठाण, दानिश अन्सारी, इद् महम्मद मुन्ना खान, इमाम शेख, सामाजिक कार्यकर्ते राज सदावर्ते, अल्ताफ पठाण यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Tags
पनवेल