ईदनिमित्त भाजप युवानेते प्रतीक बहिरा यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
ईदनिमित्त भाजप युवानेते प्रतीक बहिरा यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
पनवेल दि.२२ (संजय कदम) : मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान ईद आज भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या ईदनिमित्त तक्का परिसरातील मुस्लिम बांधवानी मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर भारतीय जनता पार्टीचे युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांनी गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 


             पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपवून आज ठिकठिकाणी नमाज अदा केली जात असून पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव ईद साजरी करताना दिसत आहेत. आज सकाळ पासूनच तक्का परिसरात मशिद मध्ये नमाज अदा करून आलेल्या मुस्लिम बांधवाना भारतीय जनता पार्टीचे युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांनी गळा भेट करून ईद च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते. थोडे नवीन जरा जुने