पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुनःस्थापनेबाबत बैठकीची जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे मागणी





पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुनःस्थापनेबाबत बैठकीची जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे मागणी
पनवेल दि.२२ (संजय कदम) : तालुक्यातील पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुनःस्थापनेबाबत शासनाबरोबर बैठक घेण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन केली आहे.   



 पारगाव ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच व विद्यमान सदस्या निशा पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक, मा उपसरपंच व विद्यमान सदस्य मनोज दळवी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांची भेट घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासकामांमुळे पारगाव गावालगतच विमानतळाचा भराव झाला असल्याने मागील दोन तीन वर्षापासून प्रत्येक पावसाळयात पुरस्थिती निर्माण झालेली आहे. 



तसेच पारगाव गावालगतच असणाऱ्या डुंगी गावाबाबत गावाचेपुनर्वसन करणेबाबत शासन / सिडको स्तरावर सकारात्मक धोरण आखण्यात आलेले आहे. असे असताना पारगाव गावालाही तशा समस्या निर्माण झालेल्या आहेत याचा विचार करुन कोणताही भेदभाव न करता पारगाव गावाचे देखील पुनर्वसन व पुनःस्थापना होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाकडे आमच्या भावना मांडून या संदर्भात मंत्रालयात बैठक लावून आम्हाला न्याय द्यावा व आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.



थोडे नवीन जरा जुने