तु. ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे सन १९८७ च्या सातवीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.तु. ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे सन १९८७ च्या सातवीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.


उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील तू.ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथील सन १९८७ इयत्ता सातवीच्या बॅचमधील माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुभम फार्म हाऊस तारा ता. पनवेल येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सुमारे ३५ वर्षांनंतर जवळपास २३ माजी विद्यार्थी एकत्र येत शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. माजी विदयार्थ्यांनी सातवी नंतरच्या ३५ वर्षाच्या जीवन प्रवासातील अनुभव व बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.एका लग्नामध्ये चार मित्र / मैत्रिणी एकत्र आल्यानंतर एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवण्यात आले व सदरच्या व्हाट्सअप्प ग्रुप वर स्नेहमेळावा करण्याचे ठरले.या मधील बरेचसे माजी विद्यार्थी हे वकील, इंजिनिअर, स्वतःच्या मालकीचे ट्रान्सपोर्ट लाईन, पोर्ट कंपनीमध्ये उच्च पदावर काम करीत आहेत. 
तसेच सामाजिक , राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत.या प्रसंगी मनोज भगत, देवेंद्र शा. पाटील, महादेव पाटील, देवेंद्र नि.पाटील, प्रणिता ठाकूर,प्रतिभा म्हात्रे, विद्या पाटील,जयश्री पाटील, प्रेमा पाटील, धर्मेंद्र घरत, दिनेश भोईर, नितीन म्हात्रे, किशोर ठाकूर,रमाकांत ठाकूर, अजय पाटील, राजेंद्र कडू, भानुदास तांडेल,भुवेश तांडेल,सुनील तांडेल, विजय मढवी, विनय ठाकूर, किशोर घरत आदी माझी विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. तसेच काही विध्यार्थीनींनी फोन वरून शुभेच्छा देत पुढील स्नेहमेळावा प्रसंगी उपस्थित राहतील असे सांगितले .शेवटी प्रणिता शिरीष ठाकूर यांनी फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व मित्रांतर्फे प्रणिता ठाकूर यांचे आभार मानण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने