उरण मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.


उरण मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.


 उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )श्री अनिरूद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरूद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरूद्ध समर्पण पथक या संस्थांनी एकत्र येत रविवार, दि. २३ एप्रिल २०२३ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते


.मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणि गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात मिळून तब्बल ८२ ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिबिर पार पडले.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात उरण नगर परिषद शाळा क्रमांक १, पेन्शनर्स पार्क उरण शहर येथे रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. यावेळी या रक्तदान शिबिरात उरण, मुळेखंड, कोप्रोली, आवरे, सोनारी या उपासना केंद्राने सहभाग घेतला. एकूण १७१ रक्त दात्यांनी रक्तदान केले. त्यापैकी १३९ स्वीकारण्यात आले.डॉ. अनिरूद्ध जोशी, एम. डी. मेडिसिन (सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्था १९९९ सालापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आत्तापर्यंत १.६५ लाख युनिट इतके रक्त संकलित केले आहे.


थोडे नवीन जरा जुने