रानमेवा मिळविण्यासाठी करावी लागते जीवघेणी धडपड,अपघाताचा धोका

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ६ एप्रिल 
,जंगलातील तयार झालेला रानमेवा बाजार पेठेत येत, असले तरी सुद्धा हा रानमेवा काढण्यासाठी जिवघेणी धडपड करावी लागत आहे.रस्त्यालगत जांभूळ,कै-या तसेच करवंदे आशी विविध झाडे असून या झाडावर आलेली फळे काढताना या मार्गावरून येणारे वाहानामुळे अपघात होण्याचा धोका मोठ्याप्रमाणावर संभवत आहे.मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी ही जिव घेणी धडपड करावी लागत असल्यांचे आदिवासीं बांधवांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.           रणरणत्या उन्हामध्ये रानमेवा तयार झाल्यामुळे अदिवासीं बांधावांना रोजगार मिळत आहे.यामुळे रोजच्या दैनंदिन व्यवहारात अर्थिकची समस्या मार्गी लागत आहे.उन्हाळ्यात आलेला रानमेवामुळे उदरनिर्वाह होत आहे.यामुळे निसर्गातील तयार होत आसलेली फळे अदिवासींसाठी मोठा दिलासा देत आहे. सकाळ आसो अथावा दुपार मात्र,या वेळेमध्ये आपल्याला रानमेवा कसा मिळेल हा एकच विचार मनामध्ये निर्माण होत आहे.               उन्हाळा सुरु झाला की हाताशी काही ही काम मिळत नसल्यामुळे जंगलातील निर्माण होत असलेला रानमेवा अदिवासींचे उदार निर्वाह चे साधन निर्माण करून दिले आहे.दोन महिने जणू या बांधवांसाठी हक्काचा रोजगार मिळत आहे.जंगलामध्ये तसेच रस्त्यालगत असलेल्या वृक्षांवर आलेली फळे काढण्यासाठी घरातील सर्वच सद्स्य एकत्र जमा होत असतात.रस्त्यावर वेगाणे येत असलेले वहान यांची पर्वा न कर्ता आपल्याला मोठ्याप्रमाणावर हा रानमेवा कसा मिळेल हाच विचार मनामध्ये रेंगाळत असतो.मात्र कधी - कधी हाच रोजगार त्याच्या जिवावर उमठत आहे. 
 
थोडे नवीन जरा जुने