श्री रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेतर्फे आरोग्य शिबिर संपन्न





पनवेल दि.०६ (संजय कदम) : श्री रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य शिबिर मौजे करंजाडी व कुभांडा येथे संपन्न झाले.
    संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस प्रमुख पाहुण म्हणून डॉ. संतोष मारूती शिंदे, आरोग्य केंद्र विन्हेरे वरिष्ठ लिपिक बबन पगारे तसेच करंजाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक अनिल ताकपेरे उपस्थित होते



. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकुतला यरमाळे यांनी केले. यावेळी राजु पवार, बाळया पवार, ग्रामपंचायत सदस्य ताराबाई वाघमारे तसेच आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. रामेश्वर महाराज म्हणाले कि, आदिवासी समाजानी उच्च शिक्षण घ्यावे, आपले आरोग्य उत्तम ठेवावे, साफ सफाई ठेवावी, लहान वयात लग्न करू नये, स्वावलंबी बनवून स्वतःचा व्यवसाय करावा व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, त्यासाठी रामेश्वर महाराज आदिवासी संस्था योग्य ती मदत करण्यास व रामेश्वर महाराज योग्य ती दखल घेवून शासन दरबारी आदिवासी समाजाला न्याय मिळविण्याकामी योग्य ती मदत करतील याची ग्वाही श्री. रामेश्वर महाराज दिली.



थोडे नवीन जरा जुने