धरणा कॅम्प परिसरात आढळला महिलेचा मृतदेहपनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला असून तिच्या नातेवाईकांचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत.    सदर महिलेचे अंदाजे वय ५० ते ५५ वर्षे असून रंग सावळा, अंगाने मध्यम, केस काळे, भुरकट, नाक सरळ, डोळे बंद, चेहरा उभट तसेच अंगात मेहदी रंगाची शर्ट व मरून रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. ०२२-२७४१२३३३ किंवा सपोनि सुनिल गुरव (मो.९४०३४४२०४२) यांच्याशी संपर्क साधावा.  
थोडे नवीन जरा जुने