पनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच राजेश रामा भोईर यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिकामी झाली होती. त्यासाठी महाविकास आघाडीच्या रोहिणी संजय भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने रोहिणी संजय भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच राजेश रामा भोईर यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिकामी झाली होती. त्यासाठी रोहिणी संजय भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. या निवडीच्या वेळी रोहिणी भोईर यांना ९ पैकी ८ सदस्यांनी उपस्थित राहून एकमताने रोहिणी संजय भोईर यांच्या नावाला पसंती दिल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्यासह काँगेस युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, शेकाप नेते प्रकाश म्हात्रे, भाऊशेठ भोईर, माजी नगरसेवक विष्णू जोशी, केशरीनाथ भोईर, हिरामण भोईर, तंटामुक्त अध्यक्ष विजय भोईर, मनोहर पाटील, प्रभाकर भोईर, संजय भोईर, मा सरपंच कांचन वास्कर, यदयश्वर भोईर, सचिन तांडेल, गुलजार म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल