श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे अन्नदान.
उरण दि 28 ( विठ्ठल ममताबादे ) श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील उरण मोरा रोड वरील भवरा येथे झोपडपट्टीतील मुलांना, लहान बालकांना अन्नदान करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांच्या हस्ते लहान मुलांना अन्नदान करण्यात आले. यावेळी संस्थचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच सुफल आहाराचे टिम उपस्थित होते. झोपडपट्टीतील बालकांनी, लहान मुलांनी या अन्नदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.