रेल्वे प्रवासादरम्यान मोबाइलसह बॅग चोरट्यांनी नेली पळवून


पनवेल दि.१३ (वार्ताहर) : रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोबाइलसह बॅग पळवून नेल्याची घटना पनवेल रेल्वे स्थानकात घडली आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदकरण्यात आला आहे.              केरळमधील रहिवासी पैट्रिक विनसन्ट हे आपल्या भावाला भेटण्यासाठी पनवेलला कोच्चीवल्ली चंडीगड संपर्कक्रांती एक्स्प्रेसने येत असताना गाडीमध्ये चोरट्यांनी त्यांच्याकडील एक आयफोनसह एकूण तीन फोन, रोख ५ हजार रूपये व इतर साहित्य अशी २ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग पळवून नेली. याविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.


थोडे नवीन जरा जुने