मिरची गल्ली नाक्याला संत गोरा कुंभार चौक नाव देण्याची शिवसेनेची मागणी

पनवेल दि.१३ (संजय कदम) : पनवेल शहरातील कुंभारवाडा परिसरात असलेल्या मिरची गल्ली चौकाला संत गोरा कुंभार चौक नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे विभागप्रमुख ऍड. आशिष पनवेलकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदन दिले आहे.                 यासंदर्भात ऍड. आशिष पनवेलकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल शहरातील मिरची गल्ली नाका येथे चार रस्ते एकमेंकाने जोडले जात असुन त्याठिकाणी लागुनच कुंभारवाडा हा परिसर आहे. तसेच महाराष्ट्र ही संताची भुमी असल्याने संताच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे म्हणुन पनवेल शहरातील (मिरची गल्ली नाका) या चौकाला संत गोरा कुंभार चौक नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
थोडे नवीन जरा जुने