कामोठ्यात हुक्का पार्लरवर कारवाई

पनवेल दि.१३ (वार्ताहर) : गेल्या काही दिवसापासून हर्बल हुक्क्याच्या नावाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करून बेकायदा हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती कामोठे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कामोठे पोलीस ठाणे हद्दीतील एका हुक्का पार्लरवर कामोठे पोलिसांनी कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले आहे.          कामोठे परिसरात हर्बल हुक्क्याच्या नावाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करून बेकायदा हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती कामोठे पोलिसांना मिळाली होती. हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याच्या अनेक तक्रारी कामोठे पोलीस ठाण्यात येत होत्या. त्यानुषंगाने कामोठे शहरातील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


थोडे नवीन जरा जुने