कुंभारवाडा परिसरातील मल्लनिस्सारणकाम लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत संत श्री गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे मागणी
कुंभारवाडा परिसरातील मल्लनिस्सारणकाम लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत संत श्री गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे मागणी

पनवेल दि.१४ (वार्ताहर) : शहरातील कुंभारवाडा परिसरातील संत गोरा कुंभार मार्ग या ठिकाणी चालु असलेले मल्लनिस्सारण बाबत चे काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी संत श्री गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना करण्यात आली आहे. याबाबत प्रतिष्ठानमार्फत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.               कुंभारवाडा परिसरामध्ये मागील काही दिवसांपासुन मल्लनिसारण बाबत संत गोरोबा कुंभार मार्ग याठिकाणी कामकाज सुरु आहे. मात्र काही दिवसांपासून हे कामकाज हे पुर्णपणे बंद असुन यामुळे नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे. तसेच येत्या १८ एप्रिल रोजी "संत गोरोबा काका पुण्यतिथी " असुन पनवेल कुंभारवाडा मंदीर परिसरामध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येते असते. त्यामुळे या ठिकाणी सुरु असलेले मल्लनिस्सारणचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी संत श्री गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उपशाखा प्रमुख प्रतीक वाजेकर हे सुद्धा यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत. 


थोडे नवीन जरा जुने