जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला मारहाण


जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला मारहाण
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघा इसमांनी एका तरुणाला रस्त्यावर पडलेला दगड हातात घेवून डोक्यात मारून दुखापत केली व त्याला लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना तळोजा फेज २ येथे घडली आहे.           सदर घटनेतील फिर्यादी मोहम्मद शहजादा मो रियाज खान (वय २४) हा तळोजा फेज २, सेक्टर १८ येथे चहा पित असतांना जुन्या भांडणाचा राग मनात धरून कारमधून आलेल्या आरोपी साउद हुसैन शेख (वय २७) व त्याच्या सोबतच्या दोन अनोळखी तरुणांनी चल कार में बैठ असे बोलून रोडवर पडलेला दगड हातात घेवून फिर्यादी यांचे डोक्यात मारून दुखापत केली व त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. याप्रकरणी तिघा आरोपींविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने