पनवेल दि.०३ (संजय कदम) : पनवेल महापालिकेच्या जुन्या मुख्यालयापासून ते नवीन मुख्यालयाला जोडणाऱ्या जुना ठाणा नाका रस्त्याचे नाव बदलून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग नामकरण करा अशी मागणी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यासंदर्भात प्रथमेश सोमण यांनी शहरातील विविध दर्शनी भागात फलकाद्वारे नागरिकांना या नामकरणासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे.
स्वातंत्र्य चळवळीसह सामाजिक व सांस्कृतिक तथा साहित्यातही भरीव कामगिरी असणारे थोर क्रांतिकारक हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर यांचे नाव पनवेल महापालिकेच्या जुन्या मुख्यालयापासून ते नवीन मुख्यालयाला जोडणाऱ्या जुना ठाणा नाका मार्गाला द्वावे अशी मागणी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरातील विविध दर्शनी भागात माहिती फलक लावले आहे तसेच याद्वारे नागरिकांना या नामकरणासाठी सहकार्याचे आवाहन शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर यांनी केले आहे. यासंदर्भात शहरातील पाच प्रमुख ठिकाणी फलक लावून महापालिकेचे लक्ष वेधले आहे.
Tags
पनवेल