कोशिश पनवेलतर्फे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून सूर पनवेलचा
प्रातःकालीन मैफिलीला वाढता प्रतिसाद


पनवेल(प्रतिनिधी) कोशिश पनवेलतर्फे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित "सूर पनवेलचा" ह्या कार्यक्रमाचा हा २५ वा आठवडा असून प्रत्येक शनिवारी पनवेलच्या वडाळे तलावाजवळ होणाऱ्या प्रातःकालीन मैफिलीला दर आठवड्याला वाढता असा प्रतिसाद पनवेलकरांकडून मिळतो आहे. आज झालेल्या कार्यक्रमाला भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे आवर्जून उपस्थित होते.खारघर येथील गायिका मनाली गर्गे - कुलकर्णी यांच्या सुमधूर आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. पनवेलचे युवा वाद्य कलाकार आदित्य उपाध्ये यांनी तबल्यावर तर सिध्दार्थ जोशी ह्यांनी हार्मोनियम वर उत्तम अशी साथ दिली. सूर पनवेलचा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी आमदार प्रशांत ठाकूर ह्यांचे स्वागत केले व मान्यवरांच्या हस्ते गायक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, गणेश जगताप, अक्षया चितळे, चंद्रकांत ताम्हणकर, रोहित अटवणे, विजय पाटील, मनोहर लिमये आदी रसिक प्रेक्षक उपस्थित होते.पनवेल मध्ये अश्या सुरेल प्रातः कालीन मैफिली होत आहेत आणि लोक उत्तम प्रतिसाद देत आहेत यातूनच आपले शास्त्रीय संगीत पुढे जाईल आणि पनवेल व आसपासच्या परिसरातील कलाकार पुढे येतील यात शंका नाही, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. दर शनिवारी पनवेलकर रसिकांना ही उत्तम संगीत पर्वणी आहे आणि त्याचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे.
सादर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ९७६९४०९१९४ हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये 'सांस्कृतिक कट्टा' या नावाने सेव्ह करून WhatsApp वर 'hi' पाठवावा. असे केल्यास आपल्याला याच कार्यक्रमांची नव्हे तर पनवेल महापालिका क्षेत्रात होणाऱ्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती आपल्यापर्यंत निःशुल्क पोहोचवली जाईल असे अभिषेक पटवर्धन यांनी यावेळी सांगितले.थोडे नवीन जरा जुने