हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ 15 एप्रिल 2023 पासून बोटी नांगरून करणार जेएनपीटी प्रशासनाचा निषेध.








हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या विविध मागण्या 38 वर्षे प्रलंबित.
प्रशासन ग्रामस्थांच्या समस्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप.
मोरा ते घारापुरी परिसरात बायको पोरांसह बोटी नांगरून करणार निषेध.
पुनर्वसन, योग्य सुविधा आदी विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण.




उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )प्रशासन शेवा कोळीवाडा गावातील जेएनपीटि प्रकल्प विस्थापित 86 शेतकरी व 170 बिगर शेतकरी 256 कुटुंबाचे शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करत नसल्याने, योग्य त्या सेवा सुविधा पुरवत नसल्याने आणि मानवी जिवन असह्य झाल्याने शेवा कोळीवाडा गावातील विस्थापितांनी शेवा कोळीवाडा गावात रहायला जाण्याचा निर्णय घेऊन दिनांक 08 जानेवारी 2023 पासून शेवा कोळीवाडा गावात राहत आहेत. आणि शेवा कोळीवाडा गावातील 17 हेक्टर जमिन साफसफाई करून दिनांक 08.08.1985 रोजीच्या मंजूर नकाशानुसार भूखंडाची आखणी करणार आहेत. 


शासनाने JNPT कडून नागरि सुविधासाठी फंड घेतलेला आहे. त्या फंडातून शेवा कोळीवाडा गावात मानवी जिवितासाठी मूलभूत नागरि सुविधा पूर्ववत करण्याबाबत ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा यांनी शासनाला कळविले आहे. त्यावर शासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.

JNPT व्यवस्थापनाने मासेमारी जमिनीवर भराव करून NSICT, NSIGT, GTI, BMCTPL, BPCL, J M BAXI, Suraj Agro, Dipak Furtilizer, Ganesh Benzoplast, Shell India, Allina यांना भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. आणि JNPT त्यातून करोडो रुपयांचा नफा कमावत आहे. या सर्व कंपन्या मच्छिमारांच्या हक्काच्या रोजीरोटीच्या जमिनीवर उभ्या असून त्यात होणार्‍या नोकर भरतीत, त्यांच्या बंदर वाढी विस्तारात सप्लाय, उप कंत्राटे देतांना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावातील विस्थापितांना जाणीव पूर्वक डावलण्याचा प्रयत्न करत आहेत.शेवा कोळीवाडा गावात नागरि सुविधा पूर्ववत करत नसल्याच्या निषेधार्थ दिनांक 15 एप्रिल 2023 पासून मोरा ते घारापुरी हक्काच्या मासेमारी परिसरात बायकापोरांसह मासेमारी बोटी नांगरून एकाच वेळी मासेमारी करून प्रशासनाचा निषेध करणार आहेत.


थोडे नवीन जरा जुने