काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ९ एप्रिल,
तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली असून,यामुळे या मार्गावरून प्रवास करतांना जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे.निगडोली येथिल चौक तसेच या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी मो-या बसविण्यांचे काम सुरु आहे.मात्र हे काम संस्थ गतीने सुरु असल्यामुळे या ठिकाणी पर्यायी मार्गाचा दुसरा तातपुरता स्वरूपात रस्ता करण्यात आले.मात्र या मार्गावरून शेकडो वहाने जात असल्यामुळे या ठिकाणी धुळीचे कण हवेत मिसळून श्वसनाचे विविध आजार होण्यांचा धोका संभवत आहे.
खालापूर तालुक्यातील निगडोली,चौक मार्गी तसेच कलोते,नावंढे घोडीवली अश्या विविध ठिकाणी रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली.मात्र काही वेळा संबंधित खाते प्रवासी वर्गांची समजूत म्हणून रस्त्यावर पडलेले खड्डे भरले जाते.मात्र तात्पुरते स्वरूपात काम असून काही दिवसात भरलेले खड्डे पुन्हा उखडले जावून वहानांचे नुकसान होत आहे.त्याच बरोबर या मार्गावरून विद्यार्थी,लहान मुळे,वृद्ध व्यक्ती यांना या मार्गाच्या रस्त्याचा सामना करावा लागत.मात्र असे असले तरी सुद्धा या कडे सातत्याने साफ दुर्लक्ष केले जात आहे.
निगडोली मार्गावर चौक बाजार पेठेत जाण्यासाठी अंतर खूप कमी असल्यामुळे या परिसरातील शेकडो नागरिक या मार्गाकरुन प्रवास करीत आहे.परिणामी रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होत आहे.शिवाय रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढत असल्यामुळे ह्या मार्गावर प्रवास करणे म्हणजे जणू जिव मुठीत घेवून प्रवास करणे असे असले तरी सुद्धा हा मार्ग जवळ असल्यामुळे वेळेची बचत व्हावी या विचारांतून प्रत्येक जण या मार्गाचा अवलंब करीत आहे
Tags
पाताळगंगा