टेनिस सेंटरचे उद्घाटन


खारघर सेक्टर 35 येथे एस टेनिस सेंटरच्या 15 व्या शाखेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी एस टेनिस सेंटरचे सर्वेसर्वा जयंत निकम व सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला भाजपचे खारघर शहर मंडल अध्यक्ष बिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विनोद घरत, माजी उपसरपंच संजय घरत, एस टेनिस अकॅडमीचे सर्वेसर्वा जयंत निकम, शेट्टी, भाजप नेते प्रभाकर जोशी यांच्यासह अकॅडमीचे खेळाडू उपस्थित होते. या वेळी परेश ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, टेनिस खेळाच्या माध्यमातून युवकांचे शरीरसौष्ठव सुदृढ रहावे, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा, त्याचप्रमाणे पनवेल महापालिका क्षेत्रात क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आम्ही सर्व जण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहोत. जयंत निकम एस टेनिस अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी हातभार लावत आहेत. आपण सर्वांनी मिळून करीत असलेल्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल, असा मला विश्वास आहे.

पुढील काळात पनवेल महापालिकेच्या सहकार्याने आपण सर्व सोयांनी युक्त असे अद्ययावत टेनिस केंद्र उभारूया, असा मानसही माजी सभागृह नेते परेश
ठाकूर यांनी या वेळी बोलून दाखविला.


थोडे नवीन जरा जुने