श्री हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा निमित्त माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची विविध ठिकाणी प्रमुख उपस्थिती







उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )श्री हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा निमित्त गुरुवार दिनाकं 06 एप्रिल 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदार संघातील पाणदिवे,गिरवले, केळवणे, आंबेवाडी , दिघाटी, मोठाभोम,पागोटे, चाणजे व उरण शहरात उपस्थित राहून श्री हनुमान देवतेचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.





या वेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उपतालुकाप्रमुख डॉ भरत घरत, शिक्षक नेते नरेश मोकाशी, विभागप्रमुख भूषण ठाकूर, महेंद्र गायकर, प्रताप हातमोडे,संदीप घरत, पागोटे सरपंच कुणाल पाटील, केलवणे सरपंच गुरुनाथ ठाकूर,शिवधन पथसंस्थेचे अध्यक्ष  गणेश म्हात्रे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.श्री हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा निमित्त माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची विविध ठिकाणी प्रमुख उपस्थिती






थोडे नवीन जरा जुने